शुक्रवार, १ मे, २०२६

काही तरी ‘मिसिंग’ आहे.…


 काही तरी मिसिंग आहे.

 

एका बाजूला मुंबई-पुणे द्रुतगती (Mumbai-pune express way) महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे आज उद्घाटन झाले. त्याचवेळी दुसरीक़डे याच महामार्गावर पुन्हा एकदा प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. मिसिंह लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे वाहतूक आणखी जलद होणार असल्याचे एका बाजूला सांगण्यात येत होते, तर दुसरीकडे सलग सुट्टीला बाहेर पडलेले अनेक नागरिक कित्येक तास कोंडीत अडकून पडले होते. याचा अर्थ आपल्या व्यवस्थेत काही तरी मिसिंग आहे. ती मिसिंग लिंक शोधल्याशिवाय यातून मार्ग निघणार नाही.

 

यंत्रणा अपुरी आहे का? अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही का? की नागरिक आणि वाहनचालकांचे चुकते आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधून योग्य ती शिस्त लावण्याचा प्रय़त्न करायला हवा. विक एंडला एकदम बाहेर पडणारे नागरिक यामुळे दरवेळीच हा महामार्गच नव्हे तर इतरही ठिकाणी अशीच कोंडी झा्ल्याचे पहायला मिळते. अशावेळी सर्व यंत्रणा आणि व्यवस्था कुचकामी ठरल्याचेही पहायला मिळते. यावर उपाय शोधले पाहिजे. हे उपाय केवळ सरकार आणि यंत्रणच्या बाजूचे नाही, तर नागरिक, वाहनचालकांच्या बाजूनेही केले पाहिजेत. शिस्त, योग्य ते नियोजन, यंत्रणाची मर्यादा लक्षात घेऊन सु्ट्ट्यांचे टप्पे, निघण्याच्या वेळांमधील अंतर वगैरे गोष्टींचा बारकाईने विचार करून त्यादृष्टीने नियोजन हवे. ए. आय. च्या युगात या गोष्टी अवघड नाहीत. केवळ दोन्ही बाजूंनी इच्छाशक्तीची गरज आहे. केवळ यंत्रणेवर टीका करून, नारिकांना दोष देऊन अगर याचे राजकारण करून हा प्रश्न सुटणार नाही. रस्त्यावरच्या मिसिंग लिंक शोधून त्या जोडल्या तरी नागरिकांच्या सवयी, स्वभाव, गरजा यांच्यातील मिसिंग लिंक शोधून त्यावर उपाय करावे लागणार आहेत.